Surprise Me!

भाईचा बड्डे खतरनाक ...पण थेट जेलमध्ये | Vimanagar | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

भाईचा बड्डे खतरनाक ..... पण थेट जेल मध्ये
विमाननगर - ऐरवी अनेक भाई मोठ्या दिमाखात वाजतगाजत आपले वाढदिवस साजरे करतात.परिसरात आपली दहशत रहावी किंबहुना मार्केट मधील आपलं वजन दहशत दाखवण्यासाठी भाई राडा घालतात. बर्याचदा याबद्दल स्थानिक तक्रार करायला धजावत नाहीत. पोलिस देखील भाईच्या या पॅटर्नकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. आणि त्यातूनच भाईच्या गुन्हेगारीला खतपाणी मिळते. आता तर भाईच्या वाढदिवसात उघड उघड तलवारी आणल्या जात आहेत. एवढंच नाही तर त्याचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करायला देखील हे महाभाग कमी करत नाहीत.
विश्रांतवाडी पोलिसांनी वाढदिवसाची केक तलवारीने कापणार्या दोन भाईंना तलवारीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. या भाईंना न्यायालयाने अशा वाढदिवसाची भेट म्हणून थेट कारागृहात रवानगी केली.
रोहित दिपक ठोंबरे (वय 21, मुंजाबावस्ती धानोरी) व नितेश बाबासाहेब सरोदे (वय 19,बर्मासेल लोहगाव) या दोघांना पेट्रोलिंग दरम्यान विश्रांतवाडी पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतले. अधिक तपासात नितेश याने रोहित याच्या वाढदिवसासाठी तलवार आणून याच तलवारीने केक कापून त्याचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले होते. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना बेकायदेशीर घातक शस्र बालगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक अभिजीत चौगुले,पोलिस हवालदार प्रवीण राजपूत,कर्मचारी यशवंत किर्वे,विनायक रामाने, प्रवीण भालचिम, वामन सावंत,रिहान पठाण,प्रफुल्ल मोरे,शेखर खराडे यांच्या पथकाने हि कारवाई केली.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon